Home मुंबई *IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येप्रकरणी दीड महिन्यानंतरही कारवाई नाही, तपासाच्या...

*IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येप्रकरणी दीड महिन्यानंतरही कारवाई नाही, तपासाच्या नावाखाली वेळकाढूपणा – खा. वर्षा गायकवाड.*

9
0

*IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्येप्रकरणी दीड महिन्यानंतरही कारवाई नाही, तपासाच्या नावाखाली वेळकाढूपणा – खा. वर्षा गायकवाड.*

*साहिल वाकोडे प्रकरणी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली साहिलच्या पालकांसह पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट.*

*अभिनेत्री दिया मिर्झाचा VDO पुन्हा प्रसारित करून त्यांची बिनशर्त जाहीर माफी मागा, धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे भाजपाचे विकृत राजकारण मुंबईच्या मातीत रुजणार नाही.*

मुंबई, दि. २ नोव्हेंबर २६..

IIT बॉम्बे मधील मागासवर्गीय विद्यार्थी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या संस्थात्मक हत्येसंदर्भात FIR होऊनही संबंधित प्राध्यापकावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. साहिलच्या हत्याला दीड महिना झाली तरी कारवाईत काहीच प्रगती होत नाही उलट साहिल वाकोडेची बदनामी केली जात आहे. साहिलच्या हत्येस जबाबदार असलेल्या प्राध्यापकांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीच्या पुनरुच्चार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकावड यांनी केला आहे.

साहिल वाकोडे प्रकरणी मुंबई काँग्रेसचे शिष्टमंडळाने खासदार वर्षा गायकवाड व साहिल वाकोडेच्या पालकांसह पोलीस महासचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. यावेळी आमदार श्री. अमीन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, गटनेते श्री. अशरफ आझमी, प्रवक्ते श्री. सुरेशचंद्र राजहंस, श्री. सुभाष भालेराव, श्री. जयवंत लोखंडे इत्यादी उपस्थित होते

यासंदर्भात बोलताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, एकीकडे चौकशी सुरु असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे या प्रकरणील CCTV फुटेज सार्वजिनक करून साहिल वाकाडे याची बदनामी केली जात आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ते प्राध्यपाक अद्याप मोकाट आहेत. चौकशी सुरु आहे एवढेचे सांगितले जात आहे. या संस्थेत मागील काही वर्षात १३ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. IIT या संस्थेत असे प्रकार का होत आहेत हे चिंताजनक असून कठोर कारवाई होत नसल्याने असे प्रकार घडत आहेत का याकडे लक्ष दिले पाहिजे अस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. साहिल वाकोडे प्रकरणी जातीने लक्ष घालून आयआयटी बॉम्बे (पवई) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करतो तसेच intelligence च्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहचवतो, असे आश्वासन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिले असल्याचेही खासदार गायकवाड यांनी सांगितले..

*अभिनेत्री दिया मिर्झाचा VDO पुन्हा प्रसारित करा*…

चित्रपट अभिनेत्री दिया मिर्झा यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीचा सुंदर आणि सकारात्मक संदेश देणारा व्हिडिओ मुंबईकरांसाठी दिला होता. मात्र, इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ महानगरपालिकेच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर कायम असताना केवळ दिया मिर्झा यांचाच व्हिडिओ भाजपाच्या दबावामुळे हटविण्यात आला, हा दुजाभाव निश्चितच धक्कादायक आणि निषेधार्ह आहे.

धर्म कोणताही असो, प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार समान वागणूक मिळालीच पाहिजे. महानगरपालिका ही सर्व मुंबईकरांची व संविधानानुसार अस्तित्वात आलेली आहे. तिथे धर्माच्या आधारावर भेदभावाला अजिबात स्थान असू शकत नाही. महानगरपालिका आयुक्त या सनदी अधिकारी आहेत. भारतीय संविधानाचे पालन करण्याची त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण कृतीची जबाबदारी निश्चित करून आयुक्तांना पदावरून तात्काळ हटविण्यात आले पाहिजे.
मुंबई महानगरपालिकेने दिया मिर्झा यांचा व्हिडिओ तातडीने पुन्हा प्रसारित करावा आणि त्यांची बिनशर्त जाहीर माफी मागितली पाहिजे. भाजपचे द्वेषाचे आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे विकृत राजकारण मुंबईच्या मातीत कधीही रुजणार नाही. मुंबईची खरी ओळख ही विविधतेतून निर्माण झालेली एकता, सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. दिया मिर्झा यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभे आहे. मुंबई प्रत्येकाची आहे आणि ती प्रत्येकाचीच राहिली पाहिजे. मुंबईत असल्या संकुचित आणि विकृत राजकारणाला थारा असता कामा नये असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here