Home पुणे *पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आधुनिकीकरणाला गती; सुरक्षित शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा आवश्यक— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आधुनिकीकरणाला गती; सुरक्षित शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा आवश्यक— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

7
0

*पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आधुनिकीकरणाला गती; सुरक्षित शहरासाठी अत्याधुनिक यंत्रणा आवश्यक— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

*वाढत्या शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना अत्याधुनिक साधनसामग्री*

*पोलीस मुख्यालय, २०० निवासस्थाने, सीसीटीव्ही-ITMSसह ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि ६५ वाहनांचे लोकार्पण*

पिंपरी-चिंचवड, ता. ३ :

वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने गती दिली आहे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध विकास उपक्रमांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ताथवडे येथील पोलीस मुख्यालयाच्या जागेचे हस्तांतरण आणि नवीन पोलीस संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. गुन्हे नियंत्रण व वाहतूक शिस्तीसाठी AI आधारित CCTV नेटवर्क आणि इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ३५० बॉडी-वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलीस वाहने पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली. पोलिसांसाठी २०० निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजनही झाले.

पिंपरी-चिंचवडचा गेल्या काही वर्षांत मोठा कायापालट झाला असून, या विकासात अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. वाढत्या शहराला पायाभूत सुविधांसोबत सक्षम कायदा-सुव्यवस्था यंत्रणा देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक साधने देण्याबरोबरच चांगले पोलीस ठाणे, प्रशस्त मुख्यालय आणि कार्यक्षम वातावरण निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम पोलीस मुख्यालय उभारण्याचा प्रयत्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम राबविला जात आहे. मुख्यमंत्री या कामांचा सातत्याने आढावा घेत असून, पोलिसांच्या निवासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये हेल्पलाइनचा प्रतिसाद वेळ पूर्वी नऊ मिनिटांचा होता; तो आता तीन मिनिटांवर आणण्यात आला आहे. आधुनिक यंत्रणेमुळे गुन्हे प्रकटीकरण, तपासातील पारदर्शकता आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार आहे. सामान्य नागरिकांना पोलीस ठाणे हे भीतीचे नव्हे, तर मदतीचे ठिकाण वाटावे, यासाठी पोलीस-नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

अमली पदार्थांविरोधात ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री पिंपरी-चिंचवड’ अभियान राबविण्यात येत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘ड्रग फ्री इंडिया’ संकल्पनेच्या दिशेने महाराष्ट्र पोलीस काम करत आहेत. विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवादही साधण्यात आला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दुष्काळग्रस्तांसाठी एका दिवसाचा पगार देत एक कोटी रुपयांची मदत केली. पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे कौतुक करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या निवास, आरोग्य आणि भविष्याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देण्यात आली.

या वेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवींद्र लांडगे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार चेतन तुपे, शंकर जगताप, विक्रम काकडे, शरद सोनवणे, उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here