*हेडलाईन: ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण उद्या लोकभवन येथे*
*मुंबई, दि. २ नोव्हेंबर
* महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने दिला जाणारा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी लोकभवन येथे होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) श्री. रवींद्र साठे, डॉ. पी. अन्बलगन (भा.प्र.से.) प्रधान सचिव उद्योग विभाग, डॉ. प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) आयुक्त, सूक्ष्म लघु एवं
*MAI MEDIA 24 साठी – तयार टू पब्लिश बातमी*
*हेडलाईन: ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण उद्या लोकभवन येथे*
*मुंबई, * महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने दिला जाणारा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी लोकभवन येथे होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे, डॉ. पी. अन्बलगन (भा.प्र.से.) प्रधान सचिव उद्योग विभाग, डॉ. प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.) आयुक्त, सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्यम (MSME), डॉ. कादंबरी बलकवडे (भा.प्र.से.) विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात २०२५ व २०२६ या दोन वर्षांचे पुरस्कार दिले जाणार आहेत.
शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या गुणवंत उद्योजकांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. २०२३ पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरू केली आहे.
२०२५ च्या पुरस्कारासाठी राज्यभरातून ४४ नामांकने आली होती, तसेच २०२६ च्या पुरस्कारासाठी राज्यभरातून ७६ नामांकने आली होती. त्यातून सन २०२५ साठी – *रक्षा रमेश वागे (ठाणे)- प्रथम पुरस्कार, संदेश परशुराम दळवी (रत्नागिरी)- द्वितीय पुरस्कार, दर्शन गोपाळदास यादव (धुळे) तृतीय पुरस्कार,* तर सन २०२६ साठी – *पारस दिलीप गोलेचा (अहिल्यानगर) प्रथम पुरस्कार, तेजल अभिमन्यू नागवडे (पुणे)- द्वितीय पुरस्कार, हर्षद नामदेव सूर्यवंशी (सांगली)- तृतीय पुरस्कार* यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबरोबर पाच अन्य उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. लोकभवन येथे केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
***
*सद् रक्षणाय, खल दमनाय.*
*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर – MAI MEDIA 24*
—
*






















