*”जय महाराष्ट्र” – अखेर संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना मराठीतून फोन!*
ठाण्याच्या प्रसिद्ध संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात “६ वर्ष येरवड्यात राहूनही मराठी शिकता आली नाही” असे वक्तव्य करून अभिनेता संजय दत्त वादात सापडला होता. या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्यानंतर अखेर संजय दत्तने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना थेट फोन करून मराठीतून संवाद साधला.
*काय घडलं होतं?*
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी महाराष्ट्रातील नामांकित दहीहंडी मानली जाते. यंदा या दहीहंडीत संजय दत्त, सुनील शेट्टी, सूर्यकुमार यादव यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सरनाईक यांच्या मराठी सक्तीच्या भूमिकेमुळे येणारा प्रत्येक सेलिब्रिटी मराठीत बोलत होता.
मात्र संजय दत्त स्टेजवर म्हणाला – *”प्रताप भाई, मी ६ वर्ष येरवड्यात राहून सुद्धा मला मराठी शिकता आले नाही.”* त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. “केवळ रिक्षा-टॅक्सी वाल्यांनीच मराठी शिकायचे का?” असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
*अखेर “जय महाराष्ट्र” बोलून फोन!*
प्रताप सरनाईक एका बैठकीत असताना संजू बाबाचा फोन खणखणला. फोन उचलताच संजय दत्तने *”प्रताप भाई, जय महाराष्ट्र…”* अशी मराठीतून सुरुवात केली.
संजय दत्त म्हणाला, “दहीहंडी कार्यक्रमात मी केवळ मस्करी करत होतो, मला चांगली मराठी येते. माझ्या बोलण्याने चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझे कुटुंबीय मुंबईकर आहोत, मी याच मातीत वाढलोय, महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे.”
*शिवसेनाप्रमुखांचे उपकार स्मरले:*
यावेळी संजय दत्तने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. “आमच्या कठीण काळात साहेब माझ्या आणि कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे होते,” असे संजय दत्त म्हणाल्याचे समजते.
*वाचा सविस्तर: http://mai24news.in*
*#SanjayDutt #PratapSarnaik #JaiMaharashtra #Marathi #ThaneDahihandi #MaiMedia24*
—





















