*विकासासोबत महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल*
मुंबई, दि. ९: महाराष्ट्र विकासात आघाडीवर आहे. जीडीपी, जीएसटी, FDI, निर्यात आणि डेटा सेंटरमध्ये राज्याची भरीव कामगिरी आहे. देशातील ६०% डेटा सेंटर महाराष्ट्रात आहेत, मुंबई ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ची राजधानी बनत आहे, असे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
NGMA मुंबई येथे झालेल्या करार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संस्कृती सचिव विवेक अग्रवाल, सिडको MD अश्विन मुदगल, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्य सचिव म्हणाले, “राज्यात विविध कालखंडातील वास्तू, मंदिरे, किल्ले आहेत. त्यांचे मूळ स्वरूप कायम ठेवून जतन झाले पाहिजे. मूळ संवर्धन पुरातत्त्व विभागाने तर बाह्य सुविधा PWD ने कराव्यात.”
पंढरपूर, नाशिक, पुरंदरवाडा येथे विकासकामे सुरू आहेत. कर्नाळा, गोरेगाव कांदळवन येथे निसर्ग पर्यटनाला चालना दिली जात आहे.
यावेळी दोन महत्त्वाचे सामंजस्य करार झाले:
१. NGMA मुंबई आणि सिडको मध्ये खारघर येथे ‘आर्ट डिस्ट्रिक्ट’ विकसित करण्यासाठी
२. राज्य सांस्कृतिक विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) मध्ये राज्यातील स्मारक संवर्धनासाठी
४० प्रमुख स्मारकांसाठी साईट मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे, असे केंद्रीय सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगितले.
—
.





















