Home मुंबई ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत...

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

22
0

*मुंबई / साखर उद्योग – मोठा निर्णय*

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

*मुंबई, दि. ९ -* राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम *१५ ऑक्टोबर २०२६* पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.

*बैठकीत काय चर्चा झाली?*
– शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधून नियोजन
– थकीत FRP व RRC चा आढावा
– इथेनॉल पुरवठा आणि सहवीज निर्मिती प्रकल्प
– सहवीज करार संपलेल्या कारखान्यांना प्रति युनिट १.५० रु. सबसिडी
– साखर पॅकिंगसाठी ज्युट बॅगची सक्ती शिथिल करण्याचा विचार
– ऊस उत्पादन वाढीसाठी विशेष ऊस विकास योजना – सुधारित वाण, रोपवाटिका, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण

*केंद्राकडे शिफारस:*
साखरेच्या MSP मध्ये वाढ, इथेनॉलच्या दरात वाढ आणि प्रलंबित व्याज अनुदान तातडीने देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णयही घेण्यात आला.


.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here