Home पुणे पुणेकरांनी अनुभवली प्रगाढ शांतीची अनुभूती आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त...

पुणेकरांनी अनुभवली प्रगाढ शांतीची अनुभूती आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त मुक्त चिंतन

6
0

विषय : पुणेकरांनी अनुभवली प्रगाढ शांतीची अनुभूती

आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त मुक्त चिंतन

पुणे : गुरुतत्त्वाच्या विश्वव्यापी अस्तित्वाच्या दिव्य अनुभूतीची प्रचिती घेत, ऐतिहासिक ८३ व्या वर्षीच्या व्यासपूजा महोत्सवात पुणेकरांनी प्रगाढ शांतीची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. आपले भौतिक अस्तित्व विराट अस्तित्वाशी जोडले आहे याची जाणीव उपस्थितांना झाली. ओम नमः शिवाय’ चा जप, ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान, गायत्री मंत्र आणि श्री श्री सुक्त, नवनाथ स्तोत्राचा जप, संकल्प-समाधी व निर्विकल्प-समाधीचा आध्यात्मिक अनुभव, आणि आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांचे उत्स्फूर्त मुक्त चिंतन अशा पवित्र वातावरणाने ही गुरुपौर्णिमा संपन्न होती.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे यंदाचा व्यासपूजा महोत्सव संपन्न झाला. महर्षि विनोद रिसर्च फाउंडेशन व महर्षि विनोद सिध्दाश्रम मंडळ, शांती मंदिर आत्मयोग-साधक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा झाला. महर्षी न्यायरत्न विनोद यांनी १९४४ मध्ये व्यक्तिगत गुरुपूजनाऐवजी परात्पर गुरु भगवान व्यास यांच्या सामुदायिक पूजेची संकल्पना प्रत्यक्षात आणत या महोत्सवाची सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्याला संकल्पशक्ती आणि विशुद्ध अध्यात्माचे अधिष्ठान लाभावे, हा व्यापक उद्देश या उपक्रमामागे होता.
पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्रा. तेज निवळीकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऑनलाईन माध्यमातून देशविदेशातील साधकांनीही उत्सवाचा आनंद घेतला.
गुरुपौर्णिमा एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता गुरुतत्वाची जी अनुभूती आहे ती अखंड आपल्यावर बरसत रहावी यासाठी प्रयत्न करावेत. उत्सव हा उत्साहवर्धक असतो. त्याची सुरुवात गुरुपौर्णिमेनिमित्त करावी. असे झाल्यास प्रत्येक क्षण हा नूत्यनितन होऊन आनंदाने आणि समाधानाने भरलेला असेल ,असा आशावाद डॉ. संप्रसाद यांनी व्यक्त केला. श्री श्री विद्या सूक्ताचे जीवनातील महत्व सांगून ते म्हणाले की ही विद्या आपल्यात प्रस्थापित झाली याचे लक्षण काय तर अद्वैतामध्ये जो आनंद दडलेला आहे तो क्षणोक्षण आपल्यातून प्रकट व्हायला लागतो.
निवेदक, ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा काशीकर यांनी ‘दैनंदिन जीवन आणि योग’ या विषयावर डॉ. संप्रसाद यांची घेतलेली मुलाखत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. डॉ. संप्रसाद यांनी व्यग्र जीवनातही टिकाऊ मनःशांतीसाठी काय करावे याची अनुभूतीसह सोप्या शब्दांत माहिती दिली. ते म्हणाले की ‘मी’ जेव्हा शांत होतो तेव्हाच आत्मिक पातळीवर सारे एक आहे याची जाणीव होते. आपले भौतिक अस्तित्व विराट अस्तित्वाशी जोडले आहे याची जाणीव झाली, खरे आध्यात्मिक मर्म समजावून घेतले की परिवर्तन होते. यासाठी बोध व्हायला हवा. यासाठी आत्मयोग माहिती हवा.”
महर्षि विनोद यांचे ध्वनिमुद्रित आशीर्वाद प्रसारित झाले. त्यांनी लिहिलेल्या, सणांची महती सांगणाऱ्या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक विधिज्ञ , आदिति वैद्य यांनी केले. आजपर्यंतच्या व्यासपूजा महोत्सवाचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ विधिज्ञ आदिती वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन पराग पोतदार व डॉ. मुक्ता भगत यांनी केले.
कळावे
आपले,

विश्वस्त मंडळ,
(महर्षि विनोद रिसर्च फौंडेशन व महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here