लग्न म्हणजे दोन घरं जोडणं, फक्त दोन माणसं नाही`
आज आपण २१ व्या शतकात आहोत. मुलं उच्चशिक्षित आहेत, मुली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. करिअर, परदेश, स्टार्टअप, घर, गाडी… सगळं काही आहे. पण या सगळ्या प्रगतीच्या गर्दीत आपण सर्वात महत्त्वाचा पाया हळूहळू ढासळताना दिसतोय का? तो पाया म्हणजे `कुटुंब आणि योग्य वयात होणारी लग्नं`.
अलीकडील सामाजिक अहवाल सांगतात की, पुढील १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी अविवाहित राहतील किंवा लग्नाचे वय ३२-३५पर्यंत जाईल. शिक्षण, नोकरी, कर्ज, “स्वतःसाठी जगणं” यात वेळ जातोय. स्त्रीने स्वावलंबी व्हावं यात दुमत नाही. पण `आयुष्याच्या शेवटी मन मोकळं करायला, सण साजरा करायला, आधार द्यायला आणि घ्यायला कोणी नसेल, तर या सगळ्या प्रगतीचा उपयोग काय?` हा प्रश्न आज प्रत्येक जागरूक पालकाच्या मनात आहे.
*`पिढ्या कशा कमी होताहेत?`*
आजी-आजोबांच्या काळात १८-२० व्या वर्षी लग्न. एका शतकात ५ पिढ्या.
आज ३० नंतर लग्न, ३३-३५ला एक मूल. त्यामुळे आपण `५ पिढ्यांवरून ३ पिढ्यांवर` आलो.
“एकच मूल” मुळे घरात आवाज कमी झाला, गल्ल्या शांत झाल्या.
सर्वात मोठा घात झाला तो `नात्यांचा`. काका, मामा, आत्या, चुलत भावंडं ही नाती आता पुस्तकातच. उद्याचा नातू जगात एकटा असेल. संयुक्त कुटुंब गेली आणि आला `एकाकीपणा`. एकीकडे वृद्ध आई-वडील एकटे, दुसरीकडे करिअरच्या ताणात तरुण.
●`मग तरुण पिढी का कोसळतेय?`●
१. नात्यांचा आधार तुटलाय`
पहिले राग आला की काका, टेन्शन आलं की मावशी होती. आज `Nuclear कुटुंब`. १००० फॉलोअर्स पण अर्ध्या रात्री फोन करायला १ नाही. नैराश्य, Anxiety वाढली.
●२. अपेक्षा vs वास्तवाची दरी`●
डिग्री आहे, स्वप्नं मोठी. पण नोकरी, EMI, फ्लॅट… ताण. सोशल मीडिया वर “Perfect” पण आतून पोकळ. यातूनच `लग्न नको` हा निर्णय.
३. मोबाईल आणि “मीच फक्त” संस्कृती`*
`Scroll` करण्यात आयुष्य गेलं. “मला Space हवी” म्हणत जबाबदारी टाळतोय. पण `Space` आणि `एकाकीपणा` वेगळे आहेत.
`आजी-आजोबा आणि आजीचा मुलगा – हरवलेला पूल`
पूर्वी आजी म्हणजे घरातलं `संस्कारांचं स्कूल`. गोष्टी, बोध, संस्कार सगळं तिथूनच.
आणि `आजीचा मुलगा` म्हणजे दोन्ही टोकं सांभाळणारा पूल. आईची काळजी आणि मुलांची जबाबदारी.
आज तोच मुलगा EMI आणि मीटिंगमध्ये अडकलाय. ज्या दिवशी तो पुन्हा आई आणि मुलं दोघांनाही वेळ देईल, त्या दिवशी कुटुंब उभं राहील.
●लग्न जोडीदार निवडताना ४पाया`●
`लग्न म्हणजे दोन घरं, दोन संस्कार जोडणं` आहे. फक्त पगार नको.
१. विचार आणि मूल्यं जुळणं`- कुटुंब, मुलांचे संस्कार, जबाबदारी यावर मतभेद नको.
२ संवाद आणि आदर`- मन मोकळं बोलता आलं पाहिजे. तो `लाइफ पार्टनर + बेस्ट फ्रेंड` हवा.
३ जबाबदारी आणि स्वभाव`- प्रामाणिकपणा, मेहनत, संयम. स्वतःची आणि आई-वडिलांची जबाबदारी पेलणारा.
४. व्यवहारिक समतोल`- वय, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, भविष्याचे प्लॅन आधीच स्पष्ट.
●`सगळ्यात महत्वाचा १ प्रश्न`
`२०वर्षांनी पैसा नसेल, आरोग्य नसेल, तरी या माणसासोबत मी आनंदाने राहू शकेन का?`
उत्तर `हो` असेल तर तोच योग्य जोडीदार. `करिअर + कुटुंब` चा बॅलन्स तोच साधेल.
*`पालक आणि समाजाची जबाबदारी`*
“आणखी 2 वर्ष” म्हणत उशीर नको. योग्य वयात निर्णय घ्या. `लग्न म्हणजे बंधन नाही, आधार आहे`.
`समाज टिकतो तो कुटुंबावर`. कुटुंब टिकतं ते `योग्य जोडीदाराच्या` निवडीवर.
म्हणून `प्रगती करा, पण मुळं तोडू नका`. `कुटुंब टिकले तरच संस्कृती टिकेल आणि समाज टिकेल`.
`विचार करा… निर्णय घ्या. वेळ निघून गेली की फक्त पश्चात्ताप उरतो.` 🙏
-_: शीतल हरीश करदेकर, MAI MEDIA 24
—



















