`विपरीत बुद्धीने विनाशकाल जवळ : निसर्गाविना माणूस १दिवसही नाही`*
माणूस स्वतःला “सर्वात बुद्धिमान” म्हणवतो.
पण त्याच बुद्धीने तो निसर्गाशी युद्ध पुकारत आहे.
आणि हीच विपरीत बुद्धी त्याला विनाशाकडे नेत आहे. बाकी प्रत्येक जीव फक्त निसर्गाने दिलेले काम करतो.
*फक्त माणूस स्वतःला मालक समजून संपूर्ण व्यवस्था मोडायला निघाला आहे.*
●१. ज्याला आपण “कीड” म्हणतो तोच जमिनीचा डॉक्टर*●
*वाळवी*
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात वाळवी नसती तर जमीन कधीच मृत झाली असती.
ती मृत लाकूड खाते, जमिनीत बोगदे करते, हवा-पाणी आत नेते आणि माती सुपीक करते.
पण आपण तिला “घर खाणारी कीड” म्हटले.
चूक कुणाची? आपणच जंगल तोडून लाकूड घरात आणले.
*बुरशी*
कोकणात बुरशी नसती तर पाने-कचऱ्याचे डोंगर साचले असते. बुरशीच ते कुजवून माती बनवते.
याच बुरशीने Penicillin दिले आणि लाखो जीव वाचवले. यीस्ट, औषधे, अन्न उद्योग सगळा तिच्यावर आहे.
पण आपल्याला बुरशी म्हटली की फक्त “रोग” दिसतो.
●२. निसर्गात “निरुपयोगी” कोणीच नाही* `गिधाड` – मृतदेह खाऊन साथीचे रोग थांबवते
`वटवाघूळ` – एका रात्रीत हजारो कीटक खाऊन शेती वाचवते
`गांडूळ` – मातीला जिवंत ठेवतो
`मधमाशी` – नसती तर 70% पिके संपली असती
`साप-घुबड` – उंदरांचा बंदोबस्त
`समुद्री काकडी` – समुद्राचा गाळ साफ करते
प्रत्येकाचे काम ठरले आहे. फक्त माणूस “फायद्याचा” आणि “नुकसानाचा” असा हिशोब लावतो.
●३. सूक्ष्मजीवांशी युद्ध = स्वतःशी युद्ध●
पृथ्वीवर जीवन सुरू होण्यापूर्वी सूक्ष्मजीव होते. आणि माणूस संपला तरी शेवटी ते शिल्लक राहतील. नत्र स्थिरीकरण, विघटन, ऑक्सिजन, पचन, रोगप्रतिकार – हे सगळे ते करतात.जंगलात खत नाही, तरी जंगल टिकते. कारण तिथे सूक्ष्मजीव आहेत.
पण आपण काय केले? अँटीबायोटिक, सॅनिटायझर, जंतुनाशक.”जंतुमुक्त” च्या नादात माती मृत केली, अन्न निर्जीव केले आणि आता नवीन-नवीन रोग स्वतःच निर्माण केले.
●४. शेवटचे सत्य जे कटू आहे●
वाघाने जंगल तोडले नाही.
सापाने नदी विषारी केली नाही.
वाळवीने हवामान बदलले नाही.
बुरशीने प्रजाती नष्ट केल्या नाहीत. पण*हे सगळे “सर्वात बुद्धिमान” माणसाने केले.*
पृथ्वीने डायनासोर बघितले. हिमयुग बघितले.
माणूस गेल्यानंतरही निसर्ग पुन्हा उभा राहील.
_कारण निसर्ग माणसाविना जगू शकतो…
पण माणूस निसर्गाविना एक श्वासही घेऊ शकत नाही._
म्हणूनच `विपरीत बुद्धीने विनाशकाल जवळ आला आहे.`
आपण पुन्हा एकदा सखोल आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
निसर्गच जीवन चक्र अखंड सुरू राहायला हवे.
—




















