Home अग्रलेख श्रद्धेने पुर्ण झालेली ‘पंढरीची वारी’, दिग्दर्शक रमाकांत कवठेकरांचीही अनोखी वारी

श्रद्धेने पुर्ण झालेली ‘पंढरीची वारी’, दिग्दर्शक रमाकांत कवठेकरांचीही अनोखी वारी

151
0

श्रद्धेने पुर्ण झालेली ‘पंढरीची वारी’

पंढरीची वारी १९८८ – मराठी संस्कृतीतील सर्वात मोठी परंपरा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न.
हा सिनेमा बनवणं म्हणजे खऱ्या वारीपेक्षा कमी नव्हतं. श्रद्धा होती, पण वाटेत संकटंही खूप होती. दिग्दर्शक रमाकांत कवठेकर स्वतः पापी वारी करणारे  विठ्ठल भक्त! या वारीतले बारकावे त्यांच्या मनाने डोळ्याने टिपलेले आणि म्हणूनच पंढरीची वारी अस्सल पात्र आणि घटनांनी भरुन राहिलेला मैलाचा दगड असणारा अनेक संकटातून  तयार झालेला चित्रपट  अशी नोंद  कायमची राहिलेली आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरीची वारी दूरदर्शन  वर दाखवला जाऊ लागला ,जशी काही गाणी दहीहंडीच्या दिवशी वाहिन्यांवर कल्ला करतात.वातावरण तयार करतात त्या दिवसाचं…तशीच ही भक्तीची पंढरीची वारी कायम मनात राहणारी ठरली.

●शूटिंगवेळी काय घडलं होतं? ७ मोठे प्रसंग

१. पहिल्याच दिवशी अपघात – अरुण सरनाईक यांचा मृत्यू
‘अण्णा’ ही मुख्य भूमिका आधी अरुण सरनाईककरणार होते. पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ही जबाबदारी बाळ धुरी यांनी पेलली.

२. रंजनाचा अपघात आणि ३ वर्षांची प्रतीक्षा
‘आक्कासाहेब’ ची भूमिका आधी रंजना देशमुख यांच्यासाठी होती. ७०% शूटिंग झाल्यावर त्यांचा भीषण अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत झाली. निर्मात्यांनी ३ वर्ष वाट पाहिली, पण चालणं अशक्य झाल्याने शेवटी जयश्री गडकरयांना ती भूमिका दिली.

३. ₹१८लाखांचं आर्थिक नुकसान
पुन्हा संपूर्ण सिनेमा शूट करावा लागल्याने निर्माते अण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांना जवळपास १८लाखांचं नुकसान सहन करावं लागलं.

४. गाभाऱ्यात शूटिंग आणि खरी वारी
चित्रीकरण आळंदी ते पंढरपूरच्या खऱ्या वारीदरम्यान झालं. इतकंच नाही तर पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा शूटिंग करण्यात आलं. म्हणूनच पडद्यावर खरी भक्ती उतरली.

*५. बकुल कवठेकर – मुक बाल विठ्ठल
विठोबाची भूमिका केली दिग्दर्शकांचे चिरंजीव *बकुल कवठेकर* यांनी. ते मुके असल्याने सगळा अभिनय फक्त हावभावातून. दुर्दैवाने २००२ मध्ये शिक्षणासाठी पुण्यात असताना त्यांचे निधन झाले.

६. ताकदवर कलाकारांची फौज
*बाळ धुरी – अण्णा, *जयश्री गडकर – आक्कासाहेब, *नंदिनी जोग – मुक्ता, *अशोक सराफ- सदा चोर, *राजा गोसावी- नाना, *राघवेंद्र काडकोळ- गणा. प्रत्येकाने जीव ओतून काम केलं.

*७ हार न मानता यशस्वी केला*
एवढ्या अडचणी, अपघात, आर्थिक तोटा सहन करूनही रमाकांत कवठेकर आणि त्यांच्या टीमने हार मानली नाही. 1988 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला आणि आजही आषाढी एकादशीला दूरदर्शनवर लागतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here