Home मुंबई *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात...

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*

18
0

*सत्ता असो नसो जनता आमच्यासोबत,शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब*

मुंबई दि. 10 जून

आज देशात सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक समाज अडचणीत आहे. सत्तेत बसलेल्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण उरलेली नाही. खतांसाठी शेतकऱ्यांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. सर्वसामान्य जनता महागाई आणि बेरोजगारीचा तीव्र सामना करत आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही. सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार,असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी मुंबई येथील वाय. बी . चव्हाण सेंटर येथे केला आहे.

आज मंगळवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोहोळ्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील, आमदार तथा नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी खासदार फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार ,पक्षाच्या सरचिटणीस अदितीताई नलावडे ,प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी , सेवा दलाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की, पक्षाची जाहिरात आज सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात देण्याची किंमत किती असते, हे मला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आजची तुमची ही अथांग उपस्थिती पाहिली, तर ही जाहिरात आपल्या सर्वांसाठी आहे, याचे आपण स्वागत केले पाहिजे. सत्ता असो नसो, तुम्ही कधी चिंता केली नाही. आपण सत्ता असली की सत्तेच्या माध्यमातून काम करतो, नसली तर लोकांमध्ये जाऊन काम करतो.असे आदरणीय शरद पवार साहेब बोलताना म्हणाले.

आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले की, प्रश्न खूप आहेत. देशाच्या समस्या आहेत. सुशिक्षित बेकार असेल, आदिवासी, महिला, अल्पसंख्या या घटकांच्या समस्यांनी देशात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नावर किती आस्था आहे, त्यावर भाष्य न केलेलं बरं. काही लोक काही दिवस सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता झालाच नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. प्रधानमंत्रीपद संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक गोष्टी आम्ही मांडू. पण धोरणात्मक पदाची प्रतिष्ठा आम्ही ठेवत असतो. त्याचा अनादर करत नाही. पण गंमत वाटते, आज दोन गोष्टी पाहण्यात आल्या. एकावेळेस त्यांनी आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंशी केली. ठिक आहे. तुम्ही पंतप्रधान झाला. त्यांना इतकी वर्ष मिळाली. त्याचं महत्त्वं आहे. पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? ही स्पर्धा नेहरू असताना सांगण्याचा प्रयत्न आहे की नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते याच्याशी आहे. मोदीही तितके काळ आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांना अधिक काळ मिळावा हे त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल तर वावगं नाही, असे आदरणीय शरद पवार साहेब यांनी स्पष्ट केले आहे.

आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले की, नेहरूंचा काळ, त्यांचं कर्तृत्व आणि योगदानाशी त्यांची तुलना होऊ शकते का? पंतप्रधान होण्या आधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचं काम केलं. मोलाची कामगिरी केली. हा इतिहासाचा भाग आहे. हे विसरू शकत नाही.संघर्ष करणारे होते. स्वातंत्र्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. संघर्ष केला. गांधींच्या नेतृत्वाखाली. शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यात नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही. असेही आदरणीय शरद पवार साहेब यांनी सांगितले.

 

*आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास असणारा निष्ठावंत कार्यकर्ता आजही आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत -प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे*

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्ष सोडलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी कमकुवत झालेली नाही. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर विश्वास असणारा निष्ठावंत कार्यकर्ता आजही आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत आहे. त्यामुळे नव्या जोशाने पक्ष पुन्हा एकदा पूर्ण ताकतीने उभा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब यांचा मावळा तयार आहे. कार्यकर्त्यांनी कुणालाही न घाबरता जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढावे पक्ष पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांच्या सोबत आहे.असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

विलिनीकरणाच्या सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत शशिकांत शिंदे म्हणाले की, ज्या नेतृत्वाने (आदरणीय शरद पवार साहेब) पक्षाला जन्म दिला, ते नेतृत्व आज आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपल्याला कोणाच्या आधाराची गरज नाही. पक्ष स्वतःच्या ताकदीवर स्वाभिमानाने उभा राहील. येत्या काळात सामान्य कार्यकर्त्याला नेता बनवणे आणि रस्त्यावरील संघर्ष अधिक व्यापक करणे हीच आमची भूमिका असेल, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले.

 

*नेते गेले तरी जनता सोबतीला – ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील*

पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंतराव पाटील यांनी पक्ष पुन्हा नव्या उमेदीने उभा राहण्याचा विश्वास व्यक्त केला. २०१४ पूर्वी हे सर्व (सोडून गेलेले) नेते पक्षात होते, तरीही आपला पराभव झाला होता. त्यामुळे काही नेते गेल्याने चिंता करण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या बळावर निवडणुका जिंकता येतात, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांची गळचेपी आणि भूक निर्देशांकातील भारताच्या घसरलेल्या स्थितीवर जयंतराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

*मालिका बंद पाडणे म्हणजे विचार रोखण्याचा प्रयत्न आहे,आमदार रोहित पवारांची ५० लाखांची मदत*

आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. आमच्यासाठी राष्ट्रवादी म्हणजे केवळ आणि केवळ आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार आहे,असे रोहित पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की,बहुजन समाजाचा इतिहास आणि महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचे विचार जनमानसांत पोहोचवणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या मालिका व उपक्रमांना काही शक्तींकडून विरोध होत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी आपल्या परिवार आणि कंपनीच्या वतीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.मालिका बंद पाडणे म्हणजे विचार रोखण्याचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही,तसेच आगामी काळात पक्ष संघटनेत कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नसलेल्या सामान्य कुटुंबातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल,असेही आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले.

 

*मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होऊ देणार नाही,आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून १० लाखांची मदत जाहीर*

 

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळेच महिलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला आणि समाजपरिवर्तनाला दिशा मिळाली,महाराष्ट्रातील जनतेने या मालिकेला पाठिंबा देऊन फुले दांपत्यांच्या विचारांचा सन्मान जपला पाहिजे.२०१४ पासून विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम सातत्याने सुरू आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित मालिका बंद पडणे ही चिंतेची बाब आहे,चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सामाजिक प्रश्नांवर भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

या सोहळ्यादरम्यान महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष साहित्याचे, ‘लोकसाहित्य’ अंकाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भिवंडी शहराच्या वतीने आदरणीय शरद पवार साहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here