*मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ‘सेतू बांधा रे’ या विशेष पंचायत पेठ*
मुंबई
अंधेरी येथे मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ‘सेतू बांधा रे’ या विशेष पंचायत पेठेस राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी ना. उदयजी सामंत ह्यांनी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल भेट देत उत्पादने, सामाजिक उपक्रम आणि या क्षेत्रातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली तसेच संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी ना. उदयजी सामंत यांनी सांगितले की, “या उपक्रमांमुळे समाजातील वंचित आणि विशेष घटकांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत. शासन म्हणून अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.
मतदानाचं गणित न बघता सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे.”
‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’, ‘खादी ग्रामोद्योग’ यांसारख्या शासकीय योजनांद्वारे या संस्थांना थेट लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पुढील काळात अशा प्रदर्शनांचे आयोजन अधिक वर्दळीच्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात करण्यावर भर देणार असल्याचे , ना. उदयजी सामंत ह्यांनी स्पष्ट केले.


















