Home Uncategorized महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीव घेतला महायुती सरकारने

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीव घेतला महायुती सरकारने

72
0

कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून गद्दारी करणाऱ्या या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सत्तेसाठी ह्या सरकारने भोळ्या – भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना मिळालं काय तर कर्जमाफीसाठी समिती!

अतिवृष्टीने आता शेतकरी उद्ध्वस्त झाला. हातातलं पिकं गेलं, बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचं पाऊल उचलतोय. पण सरकारला काही देणंघेणं नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी यांना लाज नाही.

कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत. हे खाते शेतकऱ्यांसाठी काम करते का? शेतकरी आत्महत्यांसाठी थेट जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here