नवी दिल्ली :
* उबाठा चे युवा नेते ,आ आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत झालेल्या कथित भेटीबाबत शिवसेना खा नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरेंना सल्ला व टोला दिला , म्हस्के म्हणाले की,”या भेटीला देवेंद्रजींनी दुजोरा दिलेला नाही.आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हा इतिहास आहे , शरद पवारांवर टीका केली नंतर त्यांना भेटायला गेले .सोनिया गांधींवर टीका केली नंतर त्यांना भेटायला गेले . देवेंद्र फडणवीसांवर टीका केली नंतर त्यांची भेट घेतली . काही दिवसांनी एकनाथ शिंदेंना भेटायला येतील
बुडायला लागलेली माणसे कोणतातरी आधार शोधतात .
मिठी नदीच्या गाळात दिनो बुडाला आहे
तो दिनो यांना घेऊन बुडणार आहे . म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटले असतील .
मी सामनाची मुलाखत वाचली . पक्ष संपायला आला आहे तरीही ही भाषा बोलताहेत . यांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले एका मुलाखतीत?
“मी पुन्हा येईन कोणत्या पक्षातून येईन ते माहिती नाही.”
सगळे सोडून जात आहेत थोडी तरी पक्षाची काळजी घ्या ,असा सल्लाही खा.म्हस्के यांनी उबाठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला.




















