महाव्यवस्थापकांची भेट घेणार बेस्ट कामगार सेना!
महाराष्ट्र राज्य सरकार चे पावसाळी अधिवेशन संपता संपता बेस्ट च्या मा महाव्यवस्थापकांनी विद्युत पुरवठा विभागाच्या, ‘ग्राहक सेवा’ विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटसुते यांना फक्त १३दिवसांचा कालावधी सेवानिवृत्त व्हायला शिल्लक असताना ‘बेस्ट उपक्रमा’चे ‘उप महाव्यवस्थापक’ पदी अचानक बढती दिली आहे हे वर्तमानपत्रातील बातम्यातून
समजले.
सध्या बेस्ट उपक्रमात कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही. वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडलेली आहे. याबाबत ‘बेस्ट कामगार सेने’च्या वतीने महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊनही त्यांच्याकडून केवळ आश्वासन दिली जातात. प्रत्यक्ष कार्यवाही काहीच होताना दिसत नाही.
२५-३० वर्ष सेवा करून कर्मचारी पदोन्नतीविना सेवानिवृत्त होत आहेत.
★कर्मचाऱ्यांना पदोन्नती कधी मिळणार?★
*कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे .*
◆अभियांत्रिकी विभागात पदोन्नती नाही… बसेस कमी असल्याच कारण देऊनअभियांत्रिकी विभागाच्या ●पदोन्नती नाकारल्या जातात हे अन्यायकारक आहे.
◆विद्युत पुरवठा विभागातील; महसूल मिळवून देणाऱ्या विभागात कर्मचारी जसे की, मीटररीडर, चौकशी निरीक्षक, मीटर निरीक्षक, बिल मेसेंजर. ◆ऑपेरेशन आणि मेंटेनन्स इत्यादी विभागात रिक्त पदे भरली जात नाहीत.
◆वाहतुक विभागात २५ – ३० वर्षे काम करणाऱ्या बसवाहक – बसचालक कर्मचाऱ्यांना बढती मिळत नाही.●केव्हाही,कुठल्याही आगारात अचानक बदली करण्यात येते त्यामुळे कर्मचारी चिंताग्रस्त आहेत.
*या विषयावर निर्णय घेण्यासाठी सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी , कार्याध्यक्ष ऍड उदय कुमार आंबोणकर आदिंचे शिष्टमंडळ मंगळवार दि २२ जुलै २०२५ रोजी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहेत*
Home Uncategorized अधिकारी तुपाशी,कामगार मात्र उपाशी….!* *वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती …कर्मचारी चिंताग्रस्त!*…
















