Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर सीपीआरमधील प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या*  – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या...

सीपीआरमधील प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या*  – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

186
1

*सीपीआरमधील प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा द्या*  – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना*

• विविध विभागांना भेट देऊन साधला रुग्णांशी संवाद

• फायर फायटींग, मोड्युलर ऑपरेशन थिएटर, एमआरआय साठी प्रस्ताव द्या

• अतिक्रमणे हटवून स्वच्छतेवर भर व इमारतींचे नूतनीकरण करुन घ्या

कोल्हापूर,  (जिमाका): जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सीपीआरला भेट देऊन प्रत्येक विभागाची पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला. सीपीआरमध्ये फायर फायटींगचे काम तात्काळ करुन घ्या. रुग्णांची सुरक्षितता व हवा खेळती राहण्यासाठी परिसर स्वच्छ आणि मोकळा करुन घ्या. अनावश्यक अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यवाही करा. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा द्या. तसेच इमारतींचे नूतनीकरण करुन कार्पोरेट लुक द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

प्रत्येक विभागातील पदे, भरलेली पदे व रिक्त पदे, पदभरती प्रक्रिया, ओपीडी विभागाची वेळ, वैद्यकिय तज्ज्ञ, जिल्ह्यातील थॅलेसेमिया व हिमोफेलिया रुग्ण संख्या, सीपीआरमध्ये महिला, पुरुष, बालकांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा सुविधा, पिण्याचे पाणी, राहण्याची, जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृहे, उपलब्ध औषधसाठा तसेच आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांची सविस्तर माहिती घेवून जिल्ह्यातील थॅलेसेमिया व हिमोफेलिया रुग्णांना आवश्यक फॅक्टर्स आणि औषधांचा पुरवठा वेळेत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी  येडगे यांनी केल्या.

यावेळी त्यांनी बाह्य रुग्ण विभाग, अपघात विभाग, कान, नाक, घसा विभाग, नेत्र विभाग, एक्स-रे विभाग, आंतररुग्ण विभाग, बालरोग विभाग, नवजात शिशु विभाग आदी विविध विभागांना भेटी देऊन संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली. तसेच सीपीआर मध्ये देण्यात येणारे औषधोपचार, राहण्याची जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदींबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी रुग्णांशी संवाद साधला.

1 COMMENT

Leave a Reply to Mukesh Dhawade Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here