सोलापूर “महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील हरकती दाखल करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून द्यावी.” अशी मागणी जनविकास क्रांती सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मा. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे १५ दिवसाची मुदतवाढ मतदार यादी हरकतीसाठी वाढवून देण्याच्या निवेदनात सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतील हरकती नोंदविण्यासाठी ३ डिसेंबर २०२५ पर्यंत शेवटची तारीख दिलेली आहे परंतु प्रारूप मतदार यादी प्रचंड प्रमाणात चुका असून त्या सुधारणा करून मतदार यादीचे शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी मतदारांना हरकतीसाठी दिलेली मुदत अत्यंत कमी वेळेचे असल्याने सर्व मतदारांना आपल्या हरकती नोंदविण्यास अडचणीचे होत आहे म्हणून प्रारूप मतदार यादीतील हरकती नोंदविण्यासाठी ४ डिसेंबर पासून१८ डिसेंबर २०२५ अशी एकूण पंधरा दिवस मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करीत आहोत.
तरी माननियांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रारूप मतदार यादीतील हरकती नोंदविण्यासाठी १५ दिवस मुदत वाढवून देऊन सर्व मतदारांना न्याय मिळवून द्यावा.
*हरकतीसाठी मुदतवाढ देण्याचे प्रमुख मुद्दे :-*
● मतदार यादीत नाव वगळल्याने अनेक मतदारांना आपलाच नगरसेवक निवडण्याचा अधिकार राहिलेला नाही.
● १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवा पिढीचे मतदान स्वतःच्या प्रभागात नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावणे अडचणीचे होणार आहे त्यामुळे उत्साही मतदार हे निरुत्साही होणार आहे.
● प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे गाळली गेली आहेत
● एकाच कुटुंबात इतर कुटुंबियांची नावे नोंदविली गेली आहेत.
● मतदारांना हरकती नोंदविण्यासाठी दिलेली मुदत ही अत्यंत कमी कालावधीची आहे.
● एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समावेश झालेले ५ हजार ते १० हजार इतकी मोठी संख्या आहे.
● प्रारूप मतदार यादी करताना अत्यंत घाईगडबडीने जाहीर करण्यात आल्याचे दिसून येते.
● दिलेल्या मुदतीत हरकती नोंदविणे मतदारांना अशक्य व अडचणीचे असल्याने मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.
● एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात नोंद झाल्याने त्या मतदारांना प्रलोभने दाखवून मतदान करून घेण्याची शक्यता आहे.
● दुसऱ्या प्रभागात नोंद झाल्याने मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.
● वृद्ध आजारी व अपंग मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांचे मतदान होणे अशक्य आहे.
● काही प्रभागातील मतदारांची नावे ही तालुका मतदार संघात नोंदणी करण्यात आली आहे
तरी माननियांनी वरील प्रमुख मुद्द्यांचा विचार करून मतदारांना येणाऱ्या अडचणी रोखण्यासाठी हरकती नोंदविण्यास मुदतवाढ द्यावी अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आली आहे.
Home Uncategorized *राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील हरकतीसाठी १५ दिवसांची मदत वाढ द्यावी..* —...

















