Home Uncategorized *भाजपा आमदाराचे कबुलीजबाब… महायुती सरकार ₹५० कोटींच्या कथित घोडेबाजारावर उभे असलेले सत्ताकेंद्र*

*भाजपा आमदाराचे कबुलीजबाब… महायुती सरकार ₹५० कोटींच्या कथित घोडेबाजारावर उभे असलेले सत्ताकेंद्र*

48
0

*राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची विधानसभाध्यक्षांकडे आरोप तपासाची मागणी*

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ते महेश तपसे यांनी आज महायुती सरकारवर तीव्र प्रहार केला. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती भ्रष्टाचारामुळेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

“महाराष्ट्रातील जनता *पन्नास खोके एकदम ओके* असे बराच काळ ओरडत होती; म्हणजेच विश्वासघाताची किंमत ₹५० कोटी होती, अशीच भावना लोकांमध्ये होती. आता महायुतीच्या आमदाराच्या वक्तव्यामुळे हा आरोप संशयातून प्रत्यक्ष राजकीय वास्तवात परिवर्तित झाला आहे,” असे तपासे म्हणाले.

“सत्तेतील भाजपा आमदारानेच आता सत्य जगजाहीर केले आहे. भाजपा आमदार तानाजी मुतकुले यांचे विधान हे केवळ आरोप नाही; तर संपुर्ण महायुती सरकारवर लावलेले एक गंभीर आणि माफ न करता येण्याजोगे ठपका आहे” असा हल्ला महेश तपासे यांनी केला.

*विश्वासघाताची किंमत: पक्षांतरासाठी ₹५० कोटी*

भाजपा आमदार तानाजी मुतकुले यांनी शिवसेना आमदार संतोष बांगड यांनी २०२२ च्या राजकीय घडामोडींमध्ये तब्बल ₹५० कोटी स्वीकारल्याचा आरोप केला आहे. उद्भव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी ही रक्कम देण्यात आल्याचा मुतकुले यांचा दावा आहे.

“याच भ्रष्टाचाराच्या पायावर हे सरकार उभे आहे— निवडून आलेल्या प्रतिनिधीची निष्ठा विकत घेण्यासाठी झालेला पैशांचा व्यवहार! जेव्हा सत्ताधारी स्वतःच एकमेकांवर इतक्या उघडपणे भयानक भ्रष्टाचाराचे आरोप करतात, तेव्हा संपूर्ण विधायिका आणि सरकारची वैधता धोक्यात येते,” असा तपासे यांनी प्रहार केला.

*लोकशाहीची थट्टा: विधानसभा अध्यक्ष कारवाई करतील का?*

महेश तपासे यांनी सवाल उपस्थित केला की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आमदार मुतकुले यांच्या या गंभीर आणि भ्रष्टाचाराला पुष्टी देणाऱ्या विधानाची नोंद घेणार का?

“जेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदारच ₹५० कोटी घेऊन झालेल्या पक्षांतराची कबुली देतात, तेव्हा ही लोकशाहीच्या शुद्धतेची उघडीपणे केलेली थट्टा आहे. विधानसभा अध्यक्षांनी या गंभीर प्रकरणावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे असेही पुढे महेश तपासे म्हणाले”

“शिवसेना आणि एनसीपीमधील अशाच पक्षांतरांवर उभे असलेले महायुती सरकार हे फक्त सत्ताकारण आणि भ्रष्टाचारासाठीच कार्यरत आहे, जनहितासाठी नव्हे,” असा घणाघाती आरोप तपासे यांनी केला.

*भ्रष्टाचाराला नकार द्या: मत द्या महाविकास आघाडीला*

महाराष्ट्रातील नागरिकांना विकासाभिमुख सरकार हवे आहे— अंतर्गत भांडणे, माफिया संस्कृती आणि पैशांच्या व्यवहारावर आधारलेले नाही.

तपासे यांनी मतदारांना आवाहन केले की २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निर्णायक मतदान करा.
“₹५० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कबुलीवर उभ्या असलेल्या या अस्थिर, नैतिकदृष्ट्या अध:पतन झालेल्या महायुती सरकारला जनता ठाम नकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here