*दिवस – चौथा*
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी वारी सारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून विठुरायाला आणि वारकऱ्यांना बदनाम करत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या या अपमानकारक जुलमशाही विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
घोटाळे बाज सरकारचा धिक्कार असो
शेतकरी उपाशी मंत्री तुपाशी
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो..
भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी केल्या..


















