Home Uncategorized ‘नवी मुंबई होती, आहे आणि कायम राहीलही एकनाथ शिंदे साहेबांचीच!’- ना.उदय सामंत

‘नवी मुंबई होती, आहे आणि कायम राहीलही एकनाथ शिंदे साहेबांचीच!’- ना.उदय सामंत

85
0

वाशी
आज वाशी, नवी मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि अंकुश कदम यांचा पक्षप्रवेश उत्साहात पार पडला.

यावेळी बोलताना, “नवी मुंबईतील शिवसैनिकांचा अभुतपूर्व उत्साह आणि लोकसमर्थन पाहायला मिळत असून या मेळाव्याने एक गोष्ट स्पष्ट केली – ‘नवी मुंबई होती, आहे आणि कायम राहीलही एकनाथ शिंदे साहेबांचीच!’
लोकांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या आणि त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवणाऱ्या नेतृत्वामुळे आज प्रत्येक नवी मुंबईकरांचा विश्वास हा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांवरच आहे. माथाडी कामगारांपासून ते झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक घटकासाठी न्याय मिळवून देण्याचं काम साहेबांनी केलं आहे.
आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अन्याय करणाऱ्यांना ठोस उत्तर देणं, जनतेचा विश्वास जपणं, आणि भगवा दोन-तृतीयांश बहुमताने फडकवणं ,हा प्रत्येक शिवसैनिकांचा संकल्प असला पाहिजे .”अस वक्तव्य ना. उदयजी सामंत ह्यांनी केलं

“शिंदे साहेबांनी महाराष्ट्रासाठी घेतलेल्या ध्येयवेड्या परिश्रमांना न्याय मिळवून देण्यासाठी, आता आपण सर्वांनी एकजुटीनं पुढे येण्याची गरज आहे.
अंकुश बाबा कदम यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास निश्चितच नवी मुंबईच्या राजकारणात नवी ऊर्जा निर्माण करेल. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, याची खात्री आहे.” असे देखील ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, विजय नाहाटा, विजय चौगुले आदी मान्यवर पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here