Home Uncategorized “हल्ला आमच्यावर… गुन्हा आमच्यावर? चोर सोडून संन्याशाला फाशी का?”

“हल्ला आमच्यावर… गुन्हा आमच्यावर? चोर सोडून संन्याशाला फाशी का?”

62
0

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी म्हणजेच १७ जुलै २०२५ रोजी, संध्याकाळी ५.४० ते ६ वाजेदरम्यान विधानभवनाच्या मुख्य पोर्चवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांचे गुंड व कार्यकर्ते सर्जेराव बबन टकले व इतर ६-७ जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केला.

हा हल्ला अत्यंत पूर्वनियोजित, राजकीय उद्देशाने प्रेरित आणि लोकशाहीची गळचेपी करणारा होता. विधानभवनासारख्या सर्वात सुरक्षित व संवेदनशील भागात हा हल्ला होतो, आणि पोलिस मात्र हल्लेखोरांपैकी केवळ एकालाच अटक करतात, उर्वरित आरोपींना मोकळा वाव मिळतो!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्याच्यावर हल्ला झाला त्याच कार्यकर्त्यावर पोलिसांनी भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत १० पेक्षा अधिक गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम १८९(१)(अ), १९०, १९१(२), १९४(२), १९५(१), ३५२ इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच “चोर सोडून संन्याशाला फाशी!”

हा सर्व प्रकार म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पोलीस यंत्रणेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. हा लोकशाहीविरोधी, अन्यायकारक आणि पक्षपाती वागणूक आहे.

पोलिसांना आमचा सवाल हल्ला करणारे आरोपी अजूनही फरार आहेत, त्यांना अद्याप अटक का नाही?हल्ला झालेल्या कार्यकर्त्यालाच गुन्ह्यात गोवले गेले, यामागे कोणाचा राजकीय दबाव आहे?

विधानभवनात पोलिस सुरक्षेच्या छायेखाली असताना ही अराजकता कशी चालू शकते?

आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पोलिस प्रशासनास मागणी करतो की हल्लेखोर इतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.निर्दोष कार्यकर्त्यावर लावलेले गैरवाजवी कलम तत्काळ मागे घेण्यात यावे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्यात यावी.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे स्पष्ट करतो की, आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास आम्ही कोणत्याही स्तरावर लढा देण्यासाठी सज्ज आहोत.

जय संविधान!
जय महाराष्ट्र!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here