Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद दिवाळीच्या जल्लोषापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांना प्राधान्य; एकनाथ शिंदे* *दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचून दिला...

दिवाळीच्या जल्लोषापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांना प्राधान्य; एकनाथ शिंदे* *दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचून दिला मदतीचा हात; शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार

20
0

*दिवाळीच्या जल्लोषापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांना प्राधान्य; एकनाथ शिंदे*

*दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचून दिला मदतीचा हात; शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च शिवसेना उचलणार*

*कर्जमाफीपासून पाणी-चारा नियोजनापर्यंत मदतीची ग्वाही*

जालना, ता. ९ :

दिवाळीच्या जल्लोषापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांना प्राधान्य देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. सणासुदीच्या काळात दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या दारात पोहोचून त्यांनी केवळ फराळ आणि शिधावाटपावर समाधान न मानता, शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च शिवसेना उचलणार, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारणार असल्याची मोठी घोषणा केली. कर्जमाफीपासून पाणी, चारा आणि रोजगारापर्यंत प्रत्येक प्रश्नावर सरकार आणि शिवसेना खंबीरपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जालना येथे शिवसेनेच्यावतीने दुष्काळग्रस्त शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांसाठी दिवाळी फराळ व शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त महिलाना शिलाई मशीन आणि मुलींना सायकलचे वाटपही करण्यात आले.

अंबादास तांगडे या शेतकऱ्याच्या घरी भेटीदरम्यान त्यांच्या बारावीत शिकणाऱ्या मुलीने पोलीस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. दुष्काळामुळे ज्या शेतकरी कुटुंबांतील मुलींची लग्ने रखडली आहेत, त्यांची यादी तयार करा; त्या सर्वांच्या लग्नाचा खर्च शिवसेना करेल, अशी घोषणाही त्यांनी केली. आर्थिक संकटातही तांगडे कुटुंबाने त्यांना ज्वारी-बाजरी भेट दिल्याचा भावनिक प्रसंग त्यांनी सांगितला.

शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला. ५७४ प्रस्तावित उपाययोजना आणि १६.७४ कोटींच्या निधीला प्राधान्य देण्यात येईल. कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे मदत कक्ष सुरू करावेत. पीककर्जासह अल्प व दीर्घमुदतीच्या शेतीनिगडित कर्जमाफीच्या मागणीवर मंत्रिमंडळात सकारात्मक चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान आणि युनियन बँकेचे २८ कोटींचे कर्ज माफ करण्याच्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला.

नदी खोलीकरण, रुंदीकरण, शोषखड्डे व जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी घटनास्थळीच जेसीबी लावण्याचे निर्देश दिले. मनरेगा, जलसंधारण, बंद हातपंप व नळयोजना, विहिरींचे अधिग्रहण, टँकर, जनावरांचा चारा आणि चारा छावण्या यांचे नियोजन करण्यास सांगितले.

चारा छावणी किंवा थेट अनुदानाबाबत मंत्रिमंडळात चर्चा होईल. कर्जाचे पुनर्गठन, सक्तीची वसुली थांबवणे आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कात सवलत देण्यावरही भर दिला. बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांनी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला.

लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पात्र महिलांचे थांबलेले हप्ते मिळवून देऊ आणि २१०० रुपयांचा शब्द योग्य वेळी पाळू, असे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत, उच्च शिक्षण मोफत आणि एसटी प्रवासात ५० टक्के सवलत यांचाही त्यांनी उल्लेख केला. दिवाळीनिमित्त शिधा, फराळ, महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेतून शिवसेना काम करत आहे. शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. संकटात प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी सरकार आणि शिवसेना उभी राहील. ‘जिथे संकट तिथे शिवसेना’ हा विश्वास त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे — दुष्काळग्रस्तांच्या बांधावर —

*मुख्य मुद्दे —*

– दिवाळी फराळ + शिधावाटप — पण त्यापेक्षा मोठ्या घोषणा
– शेतकऱ्यांच्या मुलींची रखडलेली लग्नं — खर्च शिवसेना उचलणार
– मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी — उदाहरण — अंबादास तांगडे यांच्या मुलीला पोलीस व्हायचंय — शिक्षणाचा खर्च उचलणार
– ५७४ उपाययोजना — १६.७४ कोटी निधी — ५ हजार अग्रीम मदत
– कर्जमाफी — पुनर्गठन — सक्ती वसुली थांबवणे — ५० हजार प्रोत्साहन अनुदान
– पाणी — चारा — मनरेगा — नदी खोलीकरण — जागेवरच JCB लावण्याचे आदेश
– लाडकी बहीण योजना बंद होणार नाही — थांबलेले हप्ते + २१०० चा शब्द

त्यांचा मंत्र — *८०% समाजकारण — २०% राजकारण — जिथे संकट तिथे शिवसेना*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here