*धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका; शिवसेना तुमच्या पाठीशी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
*जालना, दि. ९ —* दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावातील शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट दिली.
यावेळी त्यांनी तांगडे कुटुंबियांसमवेत जमिनीवर बसून भोजन केले आणि कुटुंबाशी संवाद साधला. “संकट मोठं आहे पण धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
*तांगडे कुटुंबातील मुलीच्या शिक्षणाची व विवाहाची जबाबदारी घेतली*
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तांगडे कुटुंबातील मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहाची जबाबदारी शिवसेना घेईल, असे जाहीर केले. दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचे विवाह शिवसेना सामूहिक विवाह सोहळ्यातून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
*१२ कलमी सवलती आणि ५००० अग्रीम मदत*
उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२ कलमी सवलती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत म्हणून ५००० रुपये जमा केले आहेत. शिवसेनेकडून दिवाळी शिधा वाटप करण्यात आला आहे.
शेतकरी पत्नींना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकल वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.
*यावेळी उपस्थित मान्यवर*
या भेटीवेळी मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मराठवाडा युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, नगरसेविका दर्शना झोल-खोतकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
*फोटो कॅप्शन—* जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावात शेतकरी अंबादास तांगडे यांच्या झोपडीत कुटुंबियांसमवेत भोजन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ
*Title —* धीर सोडू नका, शिवसेना पाठीशी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
*Tags —* Eknath Shinde, Jalna, Shetkari, Dushkal, Shivsena























