Home मुंबई खा.सुप्रियाताई सुळे यांच्यावर केंद्र सरकार ची पाळत

खा.सुप्रियाताई सुळे यांच्यावर केंद्र सरकार ची पाळत

119
0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांचा फोन हॅक होणे हे अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार पेगासस सॉफ्टवेयरच्या माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवत नाही ना अशी शंका कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुका आधी हा पेगासस सॉफ्टवेयर पुन्हा ऍक्टिव्ह झालाय की काय असा प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला.

पुढे महेश तपासे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून काहीच उपयोग झाला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कथन ऐकले. या दोन पक्षात फूट पाडून देखील भारतीय जनता पार्टीला मत ट्रान्सफर झाली नाही असा आत्मबोध राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला आहे. वास्तविक राज्यात फोडाफोडीचे राजकारण कशाला केले असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता भाजपला विचारत आहे व त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील भाजपला दिले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपला कुठलीच मते ट्रान्सफर होणार नाही. किंबहुना भाजपच्या उमेदवारांना आरएसएसची तरी मत पडणार का? असा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. असेही महेश तपासे यांनी स्पष्टपणे सांगितले.

महेश तपासे म्हणाले की, अमरावती बडनेरा येथील भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेस संदर्भात केलेले वक्तव्य निंदनीय आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार पैसे देत आहे. हे रवी राणा, भाजप, शिवसेना, अजित पवार गटाच्या नेत्याकडून देण्यात येत नाही आहे. तर महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. आम्हाला निवडून द्या अन्यथा पैसे परत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य चुकीचं आहे. मतदारांना भयभीत करणारा हे वक्तव्य आहे. पैसे द्या आणि मतदान करा या राणा यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी महेश तपासे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here