नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत त्यांनी स्वतः लक्ष घालण्याबद्दल आश्वस्त केलं, आम्ही पोलिस यंत्रणेवर आणि सरकारवर विश्वास ठेवला आहे, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्र येऊन हा लढा सुरू ठेवू.”असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”जोपर्यंत या ‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करू,मुख्यमंत्र्यांशी बैठक संपल्यानंतर जोपर्यंत ‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करू, ”
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढलं पाहिजे. माध्यमांनी हा विषय सातत्याने मांडल्याबद्दल मी सर्व पत्रकार, माध्यमकर्मीचे आभार मानते,महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहेत,राज्यभर जनजागृतीची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आणलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली, तर महिलांची आणि नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होईल,लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये पॅरोल नाकारण्यासंदर्भात कायद्यात बदल करण्याची गरज आहे.”असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.














