Home मुंबई खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, मासेमारीवर होणारा परिणाम संदर्भात सात दिवसाच्या आत...

खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, मासेमारीवर होणारा परिणाम संदर्भात सात दिवसाच्या आत अभ्यास समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश*

132
0

• *खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, मासेमारीवर होणारा परिणाम संदर्भात सात दिवसाच्या आत अभ्यास समिती नेमून एक महिन्यात अहवाल देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश*
*05 मार्च, 2025 रोजीच्या विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड,विक्रांत पाटील, ॲड.निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या लक्षवेधीसंदर्भात आयोजित बैठकीत निर्णय*

मुंबई दि२९ एप्रिल

राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसत आहे. याबाबत पर्यावरण, मत्स्यव्यवसाय आणि उद्योग विभागांनी दखल घ्यावी आण‍ि यासंदर्भातील संशोधन संस्थांच्या मदतीने विषयतज्ञांचा समावेश असलेली अभ्यास समिती सात दिवसाच्या आत स्थापन करुन एक महिन्यात अहवाल द्यावा जेणेकरुन हे प्रदूषण रोखता येईल. असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.दिनांक २९ एप्रिल,२०२५ रोजी विधान भवन, मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीतील ०५ मार्च, २०२५ रोजीच्या यासदंर्भातील विधानपरिषदेतील लक्षवेधीबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, विक्रांत पाटील, ॲड.निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१अनुसार दिलेल्या लक्षवेधी सूचना क्र.८८ संदर्भातील चर्चेप्रसंगी सभापती महोदयांनी संबंधीत विभागाचे मंत्री, विधानपरिषद सदस्य आणि संबंधीत अधिकारी यांची बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यावेळी दिले होते. आजच्या या बैठकीस विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे डॉ.अविनाश ढाकणे, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल बनसोड उपस्थित होते.

दुषित पाणी समुद्रात सोडले जात असल्यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. यासंदर्भात शाश्वत धोरणाची आवश्यकता असल्याचे यावेळी विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी यासंदर्भात एकात्मिक धोरण आवश्यक असल्याचे सांगून अभ्यास समितीची सात दिवसात स्थापना व्हावी आणि या समितीने एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा असे निर्देश दिले. त्यानुसार सी.एम.एफ.आर.आय. – सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंन्स्टिट्यूट, कोची तसेच एन.इ.इ.आर.आय. – नॅशनल एन्व्हॉअरमेंट इंजिनियरिंग रिसर्च इंन्स्टिट्यूट, नागपूर या संस्थेच्या मदतीने विषयतज्ञ आणि संबंधीतांची समिती नेमण्यात येणार आहे.

  • …….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here