मुंबई,
मुंबई महानगरपालिकेने पाणीपट्टीत ८% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर प्रचंड आर्थिक ताण येणार आहे. जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात ढकलणे हा अन्यायकारक निर्णय आहे. महानगरपालिकेच्या अपारदर्शक आणि अनियमित कारभारामुळे नागरिकांवर हा भार लादला जात आहे, जो कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी मुख्य अभियंता, जल अभियंता विभाग यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे की, पाणीपट्टीतील ८% दरवाढ तातडीने मागे घ्या.
अमोल मातेले यांची मागणी:
पाणीपट्टीतील दरवाढ तातडीने रद्द करावी.
महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आणावे.
जलशुद्धीकरण प्रक्रियेची पारदर्शक माहिती नागरिकांसमोर सादर करावी.
जर या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. ॲडव्होकेट अमोल मातेले यांनी कडक शब्दांत चेतावणी दिली आहे की, “जर दरवाढ मागे घेतली नाही, तर जल अभियंता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे कठोर पाऊल उचलले जाईल.”
महागाईने आधीच होरपळलेल्या मुंबईकरांवर असा आर्थिक भार लादणे सहनशीलतेच्या पलीकडे आहे. मुंबईकरांचे हक्क आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील.
—-
ॲडव्होकेट अमोल मातेले
मुंबई अध्यक्ष,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस

















