Home मुख्य बातम्या बेस्ट प्रशासन लक्ष देईल का? कि प्रवाशांचे नाहक बळी गेल्यावरच डोळे उघडणार...

बेस्ट प्रशासन लक्ष देईल का? कि प्रवाशांचे नाहक बळी गेल्यावरच डोळे उघडणार आहेत?

202
0

बेस्ट प्रशासन लक्ष देईल का?कि प्रवाशांचे नाहक बळी गेल्यावरच डोळे उघडणार आहेत?

असे खात्रीलायक समजले की, दि २०/११/२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुलुंड आगारातून दि १८/११/२०२४ रोजी घाटकोपर पोलीस स्टेशनला वेटलिज डागा गृपच्या बसेस गेल्या होत्या.सदर बसेस परत मुलुंड आगारात येत असताना सुरक्षा तपासणी दरम्यान एका बस मधील बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सुरक्षा कर्मचा-याच्या निदर्शनास आले.त्याने डागा गृपचे आगार अधिकारी रुपनावर यांना सांगुन कारवाई करण्याचे सांगितल्याचे कळते.

रुपनवार  यांनी सदर बस चालकास कामावरुन काढून टाकणार असे सांगितले .परंतु सदर कर्मचारी अजुनही बसवर काम करत आहे.

जर त्याजागी बेस्ट उपक्रमाचा कायमस्वरुपी कर्मचारी (बस चालक) असता तर, त्याला बडतर्फ करण्यात आले असते किंवा विभागीय चौकशी केली असती.

अशा कृतीमुळे बेस्ट उपक्रमाचे तसेच बेस्ट कर्मचा-यांचे नाव बदनाम होत आहे.प्रवाशांमध्ये त्यांची प्रतिमा मलीन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here