Home अग्रलेख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : डफावरची क्रांती ते पडद्यावरचा इतिहास`-शीतल हरीश करदेकर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : डफावरची क्रांती ते पडद्यावरचा इतिहास`-शीतल हरीश करदेकर

53
0

‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : डफावरची क्रांती ते पडद्यावरचा इतिहास`                                               `फावडं-तगारी हात आणि कविता ओठावर…`
`हीच होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ओळख` `ऐतिहासिक पार्श्वभूमी – शाहिरी म्हणजे विद्यापीठ`
१९ व्या शतकात आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जेव्हा `शिक्षण` आणि `वर्तमानपत्रं` सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हती, तेव्हा `चौकातला डफ` हेच विद्यापीठ होतं.

शाहिर म्हणजे फक्त गायक नव्हता. तो `बातमीदार + इतिहासकार + न्यायाधीश + क्रांतिकारक` होता.
`ब्रिटिशांविरुद्धचे पोवाडे`, `सामाजिक अन्यायावरचे लावणी-जलसे`… सगळं शाहिरीतूनच जनतेपर्यंत गेलं.                     या परंपरेला `१९४४` मध्ये `लाल बावटा कलापथक` मधून नवी धार मिळाली. आणि या धारेचं नाव होतं – *`अण्णाभाऊ साठे`

●`अण्णाभाऊ साठे – श्रमिकांचा इतिहासकार`
●जन्म`१ ऑगस्ट १९२०, वाटेगाव, सांगली
●विचार` `ही पृथ्वी शोषणाऱ्याच्या मस्तकावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.`

अण्णाभाऊंनी शाहिरीला फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी तिला `आंदोलनाचं हत्यार` बनवलं.
`स्टॅलिनग्राडचा पोवाडा`, `फौंटनची चढाई`, `परळचा प्रलय`, `संयुक्त महाराष्ट्राची मैना`.. या प्रत्येक रचनेमागे इतिहास होता, रक्त होतं, लढा होता.                                                     `२१` भाषांमध्ये अनुवाद झाला:. `१९६१` ला रशिया दौरा. तिथल्या अभ्यासकांना  याचे महत्त्व  कळले कारण अण्णाभाऊंचं दुःख हे `जागतिक श्रमिकांचं` दुःख होतं `आणि म्हणूनच  अनुवाद केले गेले सहित्याचे.

●`ऐतिहासिक दस्तऐवज – अण्णाभाऊंचे चित्रपट आणि नाटक`●
अण्णाभाऊंच्या साहित्यावर `१२ ते १४` चित्रपट झाले. प्रत्येक चित्रपट म्हणजे त्या काळच्या समाजाचा `ऐतिहासिक दस्तऐवज`.ज्यात सामाजिक  आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती नमूद झाली.

●१. वारणेचा वाघ – १९७०`
`ऐतिहासिक संदर्भ`: १९४०-५० च्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या बंडाचा काळ.
“वेगळेपण` वाळव्याचे `क्रांतीसिंह नाना पाटील` यांच्या `पत्री सरकार` सारखीच ही कथा. `रक्षणकर्ता भाऊ` म्हणून अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला सामान्य माणूस. एक क्रांतिकारी  यात येतो.

●२ `टिळा लावते रक्ताचा – १९७५`
`ऐतिहासिक संदर्भ` – जाती-धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराचा काळ.
`वेगळेपण`: १९७५ मध्येच `ऑनर किलिंग` सारख्या विषयाला हात घातला. आजच्या `सैराट` मध्ये आपण जे बघतलं ते अण्णाभाऊंनी ५० वर्ष आधी लिहिलं होतं. ते किती पुढे होते. हे लक्षात  येतं.

. ●`फकिरा`
`ऐतिहासिक संदर्भ`: स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित राहिलेल्या दलित-वंचित समाजाचे जीवन.
●`वेगळेपण`:`२७` भाषांमध्ये अनुवाद झालेली महागाथा. मातीतला माणूस नायक कसा होतो हे दाखवणारा पहिला चित्रपट.

●४. `चित्रा, राऊ, चंदनाची चोळी`
ऐतिहासिक संदर्भ`: ग्रामीण महाराष्ट्रातील प्रेम, शोषण आणि जातीभेदाचा इतिहास यात येतो.

. ● ‘होनाजी बाळा – नाटक`
`ऐतिहासिक संदर्भ`:तमाशा आणि लोककलेला `लोकनाट्याचा` दर्जा मिळवून देणारा टप्पा.
●`वेगळेपण`: या एका नाटकामुळे लोककलेला रंगमंचावर आगळा सन्मान मिळाला.                                                 ●`इतिहास ते वर्तमान – माध्यम बदललं, आग तीच`
काल `डफ` होता, आज `युट्यूब` आहे.
काल `चौक` होता, आज `इन्स्टाग्राम रील` आहे.             माध्यम बदललं पण काम तेच राहिलं – `सत्य समोर आणणं`.
`राजा नंगा आहे` म्हणायचं धाडस कालही लागत होतं, आजही लागतं.                                                              ●`ऐतिहासिक निष्कर्ष`
अण्णाभाऊ गेल्यावर `५६` वर्ष झाली. पण  तरीही त्यांची शाहिरी संंपली नाही.
कारण जोपर्यंत `शोषण` आहे, `अन्याय` आहे, तोपर्यंत प्रत्येक पिढीत एक `अण्णाभाऊ` जन्माला येणे आवश्यक आहे

●`शाहिरी जिवंत आहे… जोपर्यंत इतिहासाला प्रश्न विचारणारे लोक जिवंत आहेत!`
– शीतल हरीश रामचंद्र (बुवा)करदेकर, लेक  इटकरे वाळवा सांगली-

—-

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here