Home Trending Now सत्ताधारी नि विरोधक पण तैच – लोकशाहीचा बळी”:शीतल हरीश करदेकर (माई)

सत्ताधारी नि विरोधक पण तैच – लोकशाहीचा बळी”:शीतल हरीश करदेकर (माई)

67
0

 

*माईमीडिया२४ – अग्रलेख*
*”सत्ताधारी नि विरोधक पण तैच – लोकशाहीचा बळी”*
*लेखक: माई, मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया*
*१८जून २०२६*

*१९६० ला महाराष्ट्र जन्मला तेव्हा विरोधी आवाज टिकवला. २०२६ ला ६६ वर्षांनंतर तो आवाज का दाबताय?*

_संख्याबळाचा बागुलबुवा – लोकशाहीचा मारेकरी. आणि आजची शैली – सत्ताधारी नि विरोधक पण तैच._

*इतिहासाचा आरसा: १०% हा नियम नाही, सोय आहे*
१. १९६० – रामचंद्र भंडारे:* २८८पैकी २१५ जागा काँग्रेसकडे. विरोधात कोणीच २९ नाही. तरी यशवंतरावांनी LoP दिला. कारण _लोकशाही जन्माला घालायची होती
२. १९८४ – पी. उपेंद्र:  राजीव लाटेत TDP कडे फक्त ३० खासदार. तरी LoP दिला.
३. १९८६ – दत्ता पाटील:शेकापकडे फक्त १३ आमदार. LoP दिला.
४. १९८८ – मृणाल गोरे:जनता पक्षाकडे फक्त १० आमदार. LoP दिला.
५. २०१९ – धनंजय मुंडे: विधानपरिषदेत संख्याबळ नसताना LoP दिला.

मग २०२६ ला २० आमदार असलेल्या गटाला LoP का नाकारला?*

*कायदा काय सांगतो?*
_The Salary and Allowances of Leaders of Opposition Act, 1977_ मध्ये *१०% चा उल्लेखच नाही.* Direction १२१ ही फक्त ‘प्रथा’ आहे. प्रथा मोडता येते, कायदा मोडता येत नाही. हे लक्षात घ्यायला हवं.

*वर्तमान राजकारण: भाजपायुती सरकारची शैली*
आज भाजपा युती सरकार सत्तेत आहे. शैली एकच – संख्याबळाच्या नावाखाली आवाज दाबायचा.         विधानसभेत: ‘संख्या नाही’ म्हणून २० वर LoP नाकारला. १९८६ ला १३ वर दिलं होतं.
*लोकसभेत:* ‘संख्या जमवून’ पक्ष फोडण्याची भीती – अरविंद सावंत यांचं १६जूनचं पत्र.

*इतिहास सांगतो  की यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या जन्मावेळी विरोधकांचा विचार केला. आज युती सरकार फक्त स्वतःचा विचार करतंय.

सगळ्यात मोठा धोका: सत्ताधारी नि विरोधक पण तैच
आज परिस्थिती अशी आहे की *सत्ताधारी नि विरोधक पण तैच अशी भूमिका निभावताना दिसतेय. जे कालपर्यंत विरोधात होते, ते आज सत्तेत आहे. खुर्ची बदलते, पण भूमिका बदलत नाही. सगळे मिळून संख्याबळाचं राजकारण करतात.  यात लोकशाहीचा बळी जातो.                                          “मी म्हणजे पक्ष”हा अहंकार जेव्हा येतो, तेव्हा आमदार दुखावतात, खासदार दुखावतात. पक्ष फुटतो. मग कारनामे समोर येतात.
९१वी घटनादुरुस्ती आणली पक्षांतर बंद करायला, पण पळवापळवीचा बाजार आजही सुरूच आहे.

*हिशोब कोणाचा?*
आज हिशोब मागितला जातो. हिशोब सगळ्यांचाच लागला पाहिजे.फक्त विरोधकांचा नाही,सत्ताधाऱ्यांचाही लागावा.
*१५ कोटींचा हिशोब कोर्टात लागेल. पण लोकशाहीच्या हिशोबाचं काय?* LoP नाकारला, आवाज दाबला, पक्ष फोडले – याचा हिशोब कोण देणार?                              १९६० ला यशवंतरावांनी हिशोब दिला, हिशोब मागितला नाही.कारण लोकशाहीत पारदर्शकता महत्त्वाची.!

*शेवटचा प्रश्न:*
१९८४ ला राजीव गांधींनी ३० वर लोकशाही जपली. आज युती सरकार २० वर गळा दाबतंय.कारण प्रश्न संख्याबळाचा नाही, इच्छाशक्तीचा आहे. संस्कारांचा आहे.*

*१९६० ला यशवंतरावांनी ० वर लोकशाही जन्माला घातली. आज युती सरकार २० वर तिचा अंत का करतंय?

खुर्ची रिकामी ठेवली तरी प्रश्न रिकामे होत नाहीत.पण जेव्हा सत्ताधारी नि विरोधक पण तैच होतात, “मी म्हणजे पक्ष” वाला अहंकार येतो, तेव्हा प्रश्न विचारणारं कोणीच उरत नाही.

१८ जूनचा मुहूर्त जिजाऊ-आगरकरांच्या साक्षीने. इतिहासाचा आरसा समोर आहे.
*युती सरकारने ठरवायचं – यशवंतराव व्हायचं की हुकूमशहा?*

*चांगभलं!* 🙏

चर्चा तर होणारच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here