*”हा मराठी माणसांचाही अपमान आहे”* – हेच तर अंतिम सत्य आहे. शिव्या आईला, बदनामी भाषेला, आणि अपमान समस्त मराठी माणसाला
*१७ जून: हा केवळ आईचा नाही, समस्त मराठी माणसाचा अपमान आहे*
*जिजाऊ, आगरकरांच्या साक्षीने जामीनावरील ‘दळण दळणाऱ्या’ वृत्तीला जाब*
आज *१७ जून*. तीन स्वाभिमान-स्तंभांची पुण्यतिथी.
*जिजाऊसाहेब* – ज्यांनी *माता-भगिनींच्या रक्षणासाठी शिवबांना स्वराज्याचे बाळकडू पाजले.*
*झाशीची राणी लक्ष्मीबाई* – मराठी वीरांगना, जिने मातृभूमीसाठी प्राण दिले.
*समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर* – ज्यांनी मराठीला विवेकाची, नीतीमत्तेची भाषा बनवले.
*आणि आज याच मराठी मातीत, जामीनावर असलेले खासदार संजय राऊत काय करतात?*
*१. स्वतःच्याच पक्षातील/आघाडीतील ६ लोकप्रतिनिधींच्या आईवरून शिव्या देतात, असा आरोप.*
*२. “खासदार फुटले, १५ कोटी घेतले, ५० कोटीची बोली लागलीय” – असे बिनबुडाचे आरोप करतात.*
*३. विचारलं तर निर्लज्ज समर्थन – “म्हणे मराठी भाषा अशीच असते.”*
*प्रश्न एकच – खासदारांच्या आईचा इथे काय संबंध?* आणि *पक्षातील लोकप्रतिनिधींचं खच्चीकरण का करत आहेत?* यांना कोणी सांगितलं? हे या व्यवहारात आहेत का?
*पण सगळ्यात महत्वाचं – हा केवळ त्या ६आयांचा अपमान नाही. हा समस्त मराठी माणसाचा अपमान आहे.*
*कसा?*
*जिजाऊंनी शिवबाला शिकवले – “प्रत्येक स्त्री ही मातेसमान.”* आज शिवरायांच्या नावाने राजकारण करणारे, मराठी माणसाच्या आईला शिव्या देतात. *म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा अपमान. म्हणजेच मराठी माणसाचा अपमान.*
*समाजसुधारक आगरकरांनी मराठी भाषा घडवली.* त्यांनी ‘सुधारक’मधून मराठीला बुद्धिप्रामाण्यवाद शिकवला. *आज “मराठी भाषा अशीच असते” म्हणून शिवराळपणाचे समर्थन केले जाते. म्हणजे आगरकरांच्या विचारांचा अपमान. म्हणजेच मराठी माणसाचा अपमान.*
*शिवरायांनी परस्त्रीचा सन्मान केला. लक्ष्मीबाईने स्त्री-सन्मानासाठी लढाई केली.* आणि आज मराठी नेता टीव्हीवर बसून मराठी माणसाच्या आईचा अपमान करतात. *हा शिवरायांचा, लक्ष्मीबाईचा अपमान. म्हणजेच मराठी माणसाचा अपमान.*
*आज मीडियामधून जे थैमान घातले गेले, खात्रीलायक माहितीशिवाय जे ‘दळण दळलं’ गेलं, ते लोकशाहीला घातक आहेच.* पण जेव्हा ते दळण मराठी माणसाच्या अस्मितेवरून फिरवलं जातं, तेव्हा ती लोकशाहीची कत्तल असते.
*इथे पत्रकारांची जबाबदारी सर्वात मोठी आहे.* आगरकर पत्रकार होते. त्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान जागा केला. *आजचा पत्रकार काय करतो?* मराठी माणसाचा अपमान होत असताना मुग गिळून बसतो. “तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात” हे सुनावण्याची हिंमत नाही. *ही पत्रकारिता नाही, ही शरणागती आहे.*
*१०० वर्षांच्या विधानपरिषदेने* मराठी माणसाचा सन्मान केला. वि. स. पागे, यशवंतराव चव्हाण यांनी मराठीचा सन्मान वाढवला *आजचा हा नेता मराठीलाच ‘शिवराळ’ ठरवून तिचा दर्जा घालवत आहेत.*
●*आज १७ जून च्या मुहूर्तावर, तिघांच्या साक्षीने, मराठी माणसाच्या वतीने जाहीर जाब:*
*१. खासदारांच्या आईचा काय संबंध?* आईचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान. जिजाऊंचे बाळकडू हेच सांगते.
*२. पक्षातील लोकप्रतिनिधींचं खच्चीकरण का?* स्वकीयांना संपवणे हा मराठी बाणा नाही.
*३. “१५ कोटी-५० कोटी”चे पुरावे द्या.* जामीनावर असून बेछूट आरोप करणे हा न्यायालयाचा आणि मराठी जनतेचा अपमान.
*४. “मराठी भाषा अशीच असते” ही थाप बंद करा.* ही आगरकरांच्या मराठीची, शिवरायांच्या मराठीची, जिजाऊंच्या मराठीची बदनामी आहे.
*५. समाजातील नीतीमत्ता जपलीच पाहिजे.* पत्रकारांनी ‘दळण दळणे’ थांबवावे. वृत्तवाहिनीने संपूर्ण क्लिप जाहीर करावी. @MahaCyber व @police यांनी मराठी माणसाच्या अपमानाची चौकशी करावी.
*१७ जून सांगतो – जिजाऊंचे बाळकडू, आगरकरांचा विवेक हाच खरा मराठी माणूस आहे.* “आईवरून शिव्या” आणि “दळण दळणारी” पत्रकारिता हा मराठी माणूस नाही, ही विकृती आहे.
आज शपथ घेऊ – *मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही. नीतीमत्ता हीच आमची ओळख. दळण नाही, सत्य देऊ.*
समाजसुधारक आगरकरांना, जिजाऊसाहेबांना, झाशीच्या राणीला त्रिवार वंदन.
आणि समस्त मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या प्रत्येक वृत्तीचा जाहीर निषेध.
‘शीतल हरीश करदेकर
—



















