Home मुंबई आधी पाया ,आता कळस या उक्तीप्रमाणे बेस्ट उपक्रम कायमचा संपविण्याचे कारस्थान

आधी पाया ,आता कळस या उक्तीप्रमाणे बेस्ट उपक्रम कायमचा संपविण्याचे कारस्थान

19
0

सन्माननीय बेस्ट कामगारांनो दि.९/६/२०२६ रोजी बेस्ट भवन कुलाबा येथे बेस्ट महाव्यवस्थापक यांच्या दालनात एक महान नाट्य घडले…

आपली बेस्ट वाचवा , आपल्या बेस्ट कर्मचारी वर्गाची प्रलंबित देणी द्या , बेस्ट मधे कर्मचारी भर्ती करा ..अन्यथा बेस्ट बंद करू ..या मागण्यांची नौटंकी करण्यासाठी उबाठा गटाचे युवराज आपल्या काफिल्या सोबत पहिली भेट घेण्यासाठी दाखल झाले होते..

बेस्ट च्या सुज्ञ कामगारांना याची जाणीव नक्कीच आहे..

सन २०१७ साली हेच युवराज मुंबईचे पालकमंत्री होते..त्यावेळी सर्वप्रथम मी बेस्ट कामगार सेना युनियनचा अध्यक्ष असतानाही मला विश्वासात न घेता प्रथम एम पी ग्रुप याना वेट लिज बसचे काँट्राक्ट देण्यात आले..ती कंपनी कोणाच्या नातेवाईकांची होती ? याची सर्वांना जाणीव आहे.. आता त्या ४०० बस कोठे धूळ खात आहेत ? त्या बसेस ना केंद्र सरकारचे अनुदान ७५ टक्के , राज्य सरकारचे अनुदान १० टक्के आणि बी एम सी चे अनुदान ५ टक्के असताना हा सर्व पैसा गोर गरीब जनतेच्या टैक्स मधूनच वसूल केला जातो ना मग त्या ऐवजी बेस्ट स्वमालकीच्या बसेस का नाही आणल्यात ..कारण की मलिदा खाण्यासाठी ही वेट लीज (बेस्ट चे खाजगीकरण ) यांनीच सुरू केले ..

त्यावेळी सुमारे रु. ३६५ कोटी वजात असलेली बेस्ट आता शेवटचे श्वास घेत रू.२५००/- कोटी वजाती मधे नेवून ठेवली आहे..

तसेच बेस्ट मधील कर्मचारी वर्गास असलेली उपहारगृह सुविधाही यांची बंद केली ..कर्मचारी वर्गास त्रास दायक कुप्रथा सुरू केल्या आज सर्व उपहारगृहे घाणीचे साम्राज्य बनले आहेत…आणि बेस्ट ला उतरती कळा सुरू झाली ..

आता शेवटचा हाथ मारण्यासाठी आणि स्वतःचा पक्ष आणि प्रतिष्ठा जपण्याचे कुभांड करण्यासाठी पुन्हा येथे दाखल झाले आहेत……

दुसरे महाशय स्वतःला वकील समजणारे आणि कृती समितीत १२ संगठना घेवून २ वकील दि. १८/६/२०२६ रोजी संप ठोकू पाहणारे .
यांनी तर सेवानिवृत कर्मचारी वर्गास आपले पैसे मिळवून देण्यासाठी दुकान उघडले आणि प्रत्येकी रु १२,०००/- असा रेट सुरू केला..बिचारा कामगार विनाश काले विपरीत बुद्धी प्रमाणे जवळपास ५०० सेवानिवृत कर्मचारी वर्गाने यांना पैसे दिले परंतु त्यांची कामे झाली नाही …यांची पोटे भरली ..प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून यांच्या संपाला विरोध करणार आहेत..अश्या फेकू नेत्यांसोबत कोणता कामगार संपावर जाणार आहे..देवालाच माहिती..

तिसरे महाशय तर सन २०१९ रोजी ऐतिहासिक संप ९ दिवस चालला आणि विजयी भव भावनेतून वडाळा कर्मचारी वसाहतीमध्ये विजयी मिरवणूक काढीत सर्व कर्मचारी वर्गास नतमस्तक होत एकही वेट लीज ची बस आली तर प्रथम माझ्या अंगावरून जाईल अशी भीम प्रतिज्ञा करणार महाभाग , त्यावेळचे महानगर पालिका आयुक्त श्री प्रवीण परदेशी यांच्या सोबत उच्च न्यायालयात ७०००वेट लीज
बसेस ना परवानगी देवून मोकळे झाले..

आणि आज स्वतःच बेस्ट उपक्रम आणि कर्मचारी याना वाऱ्यावर सोडून , वेट लिज बस कर्मचारी यांची युनियन चालवीत आहेत ..

असो ..
आपणास मी अजूनही स्वस्थ बसलेलो नाही.
मी अजूनही वृद्ध झालेलो नाही..
मी फक्त हताशपणे या माझ्या बेस्ट चे विदारक दृश्य पाहत होतो ..

मी पुन्हा आपल्या साठी आणि माझ्या मुंबईकर जनतेसाठी पुन्हा मैदानात उतरून सर्व राजकीय शक्तीसोबत आपली बेस्ट वाचवण्यासाठी उभा राहत असून आपल्या सेवेसाठी लवकरच येत आहे…
मला नक्कीच शाश्वती आहे..माझ्या अखेरच्या श्वासपर्यंत आपणही मला पूर्वी सारखी साथ देणार असून आपला बेस्ट उपक्रम पुन्हा दिमाखात गौरवशाली करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत…

संप वगैरे सब झूट है..

लवकरच आपल्या आणि बेस्ट प्रशासनाच्या भेटीसाठी येत आहे…

आपलाच विश्वासू
श्री सुहास सामंत
अध्यक्ष
बेस्ट कर्मचारी अधिकारी सेना युनियन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here