Home मुंबई *इंधन दरवाढी विरोधकांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड* यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत...

*इंधन दरवाढी विरोधकांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड* यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सर्वत्र आंदोलन*

15
0

इराण-इस्त्राईल युद्धाच्या नावाखाली मोदी सरकार देशातील जनतेची लुट करत असून पेट्रोल डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे. मागील १०-१२ दिवसात इंधनाचे दर सातत्याने वाढवले जात आहेत.पेट्रोल कंपन्यांच्या नफेखोरीसाठी भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे. पेट्रोल डिझेलचे सीएनजीचे वाढवलेले दर तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सर्वत्र आंदोलन केली जात आहेत.

आज चारकोप विधानसभेत जनतेची लुट थांबवा, पेट्रोल-डिझेल-सीएनजीची दरवाढ मागे घ्या या मागणीसाठी माजी मंत्री आमदार Aslam Shaikh जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष राजपती यादव, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, स्लम सेलचे अध्यक्ष नीलेश नानचे, नगरसेविका डॉ अजंता यादव, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, स्लम सेलचे जिल्हा अध्यक्ष फारुख शेख आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here