गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत ह्यांनी पुणे दौऱ्यादरम्यान एकलव्य अभ्यासिका व वसतिगृहातील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी श्री गणेशा चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धी,प्रगती आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना केली.
या अभ्यासिकेत शेकडो विद्यार्थी UPSC / MPSC तसेच विविध प्रशासकीय सेवांसाठी अभ्यास करीत आहेत. श्री गणेश पूजनानिमित्त आज ना. उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेत श्री गणराय कृपादृष्टी ठेवो हीच प्रार्थना करतो.” असे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.

























