Home मुंबई *रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन.*

*रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन.*

18
0

*केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करा.*

मुंबई,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग होत जोरदार घोषणाबाजी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केला. या आंदोलनाची भनक लागताच पोलिसांनी सकाळपासूनच टिळक भवनला वेढा घातला होता. टिळक भवनला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही युवक काँग्रेसच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विकृत चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ”

“लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असताना भाजपा सरकारने मात्र पोलिसांना पुढे करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही धिक्कार करतो. केरळमधील इंजिनिअर आनंदू अजि यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी”, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here