‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, बोरवली शाखा आणि ‘पोईसर जिमखाना’ आयोजित, *राज्य स्तरीय सुवर्ण कलश एकांकिका स्पर्धा* २०२५ चे दिनांक ०९.०८.२०२५ रोजी सकाळी दहा वाजता ‘पोईसर जिमखाना’, कांदिवली येथे खासदार गोपाळ शेट्टी , पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, नाट्य परिषद, बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत, उपाध्यक्ष मोहन परब, विश्वनाथ माने, स्पर्धेचे परीक्षक सुप्रिया विनोद आणि अभिनेते अनिल गवस तसेच स्पर्धाप्रमुख प्रशांत जोशी आणि संदीप कबरे, हेमंत बिडवे, प्रफुल्ल कारेकर, राजन पिसाट, चंद्रकांत मोरे, समीर तेंडुलकर, सुरेश दळवी ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. खा. गोपाळ शेट्टी ह्यांनी ह्या उपक्रमाचं कौतुक करून सर्व सहभागी संस्थांना शुभेच्छा दिल्या. “बोरिवलीतील ‘साईबाबा नगर’ येथे रसिक प्रेक्षकांसाठी नवीन नाट्यगृह, त्यांच्या प्रयत्नामुळे लवकरच सुरू होत आहे”, असे जाहीर केले.
ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘नाट्य परिषदे’चे प्रमुख कार्यवाह दामोदर (बाळा) टेंबुलकर ह्यांनी केले. ह्या प्रसंगी ‘बोरिवली शाखे’चे पदाधिकारी, समिती सदस्य, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते . ह्या एकांकिका स्पर्धेत एकूण २६ संस्थांनी भाग घेतला आहे.